पुणे – विविध खासगी कंपन्यांमधील रिक्त पदांसाठी निगडी येथे मंगळवारी (दि.18) पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एकूण 32 कंपन्या सहभागी होणार असून, त्यामधील एकूण 3 हजार 737 रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
या मेळाव्यात सहभागी होण्याकरिता दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर, कोणताही आयटीआय ट्रेड, बी.ई. मेकॅनिकल, बीबीए, एमबीए, बी.एस्सी., एम.एस्सी., बीसीए, बीसीएस, एमसीए, एमसीएस, एमसीएम अशा पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांच्या आवश्यक्तेनुसार झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो, बायोडाटा व आधारकार्डची झेरॉक्सप्रत सोबत आणावी.
यमुनानगर, निगडी येथील मॉडर्न महाविद्यालयात मंगळवारी (दि.18) सकाळी दहा वाजता हा मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मार्गदर्शन अधिकारी ह. श्री. नलावडे यानी केले आहे.