पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून हातात हत्यारे घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना सिंहगडरोड पोलिसांनी अटक केली आहे.
रवि मधुकर जाधव (23), अमित सुर्यकांत मोरे (23) आणि चेतन नामदेव भरम (24, तिघेही रा. रायकर मळा, धायरी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत सौरभ रायकर (26, रा. रायकर मळा, धायरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
रविवारी 14 जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी सौरभ हे जेवण करून ते राहत असलेल्या घराच्या पार्किंगमध्ये त्यांच्या कारमध्ये बसले होते. यावेळी पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ तिघेजण हत्यारे घेऊन थांबले होते. सौरभ यांच्या भावाबरोबर झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून त्यांना शिवीगाळ करून त्यांची चालती गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. सौरभ हे गाडी न थांबविता निघून गेल्याने अनर्थ टळला. त्यानंतर मन:स्थिती ठिक नसल्याने सौरभ यांनी आज फिर्याद दिली.