तृतीयपंथियांच्या वेदनेला वाचा फोडण्याचा प्रयत्न

किशोर मनतोडे 
पिंपळे गुरवमधील नेवियल भास्करन यांचा लघुचित्रपट

दापोडी  – तृतीयपंथियांना सामाजिक प्रवाहात सामावूण घेण्याकरीता शासनाने अनेक योजना राबवित त्यांना सामाजिक कवच प्रदान केले आहे. मात्र समाजाने अद्याप त्यांचा स्विकार न करता अपमानास्पद वागणूक दिली. या गंभीर व भावनात्मक विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न नेवियल भास्करण यांनी “इब क्‍या कोथी’ या लघु चित्रपटाद्वारे केला आहे. या चित्रपटाला अनेक पारितोषिके मिळाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

पिंपळे गुरव येथिल नेविएल भास्करन यांनी ही वास्तविकता आपल्या हिंदी भाषेतील लघु चित्रपटाद्वारे समाजासमोर मांडली आहे. संबंध प्रस्थापित तृतीयपंथियांना “कोथि’ असे संबोधले जाते. “इब क्‍या कोथि’ या 15 मिनिटांच्या चित्रपटात निधन झालेल्या एका मैत्रिणीची 10 वर्षाची मुलगी तृतीयपंथीय दत्तक घेते. तृतीयपंथियाची मुलगी म्हणून सहन करावी लागणारी अवहेलना या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. यात तृतीयपंथियांना भेडसावणारे अनेक प्रश्‍न मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या लघु चित्रपटाचे निर्माता फिल्म स्मिथस व एलिजाबेथ भास्करन असून कथा पटकथा संवाद व दिग्दर्शन नेविएल भास्करन यांनी केले आहे. संतोषी कदम यांनी “काजल’ ही तृतीयपंथियाची तर सबा मणियार हिने दत्तक मुलीची “परी’ची भूमिका साकारली आहे. पुढील महिन्यात गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात हा चित्रपट पाठविला जाणार आहे. भास्करन यांचा हा चौथा समाज प्रबोधनात्मक लघुपट आहे.

मोठ्या चित्रपटांना ज्या प्रकारे चित्रपटगृहाचे व्यासपीठ मिळते. त्या प्रमाणे लघुचित्रपटा करीता केवळ फिल्म महोत्सव पुरते मर्यादीत स्वरुपाचे व्यासपीठ न मिळता व्यापक स्वरुपाचे व्यासपीठ मिळण्याची गरज आहे.

– नेविएल भास्करन, चित्रपट दिग्दर्शक.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)