“सर्वाधिक मताधिक्‍यासाठी प्रयत्न करा’

नीरा नरसिंहपूर – बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या उमेदवार अंकिता पाटील यांना राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ खरेदी-विक्री संघाचे सभापती इंदापूर तालुका अप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.

ऍड. कृष्णाजी यादव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अशोक घोगरे, प्रशांत पाटील, श्रीमंत ढोले, संजय सोनवणे, दत्तात्रय घोगरे यांची भाषणे झाली. यावेळी अपक्ष उमेदवार बाळासाहेब भोसले यांनी उमेदवारी मागे घेऊन अंकिता पाटील यांना पाठींबा जाहीर केला. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, नगराध्यक्षा अंकिता शहा, हनुमंत कोकाटे, विलास वाघमोडे, प्रदीप जगदाळे, युवा नेते राजवर्धन पाटील, विलास ताटे, संतोष मोरे, संजय बोडके, सोमनाथ मोहिते, संजय देशमुख, शरद जगदाळे, नरहरी काळे, जगदीश सुतार, दादाभाई शेख, हरिभाऊ सुतार, सरपंच आबासाहेब बोडके, कमलेश डिंगरे, नितीन सर्वदे, डॉ. सिद्धार्थ सर्वदे, प्रदीप बोडके उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.