पुणे – सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे वार्षिक लेखापरीक्षण अहवाल धर्मादाय संघटनेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
15 ऑक्टोंबरपर्यंत लेखापरिक्षण अहवाल संस्थांना सादर करता येईल, याबाबतचे परिपत्रक राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी काढले असल्याची माहिती पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे, पुणेचे अध्यक्ष ऍड. शिवराज कदम जहागिरदार यांनी दिली. 30 सप्टेंबरपर्यंत लेखापरिक्षण अहवाल सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थाना सादर करावा लागतो. त्याला आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.