करोना संसर्गानंतर ट्रम्प यांचे प्रथमच सार्वजनिक दर्शन

वॉशिंग्टन – करोना संसर्गामुळे वॉल्टर रिड हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज प्रथमच सार्वजनिक दर्शन दिले.

व्हाईट हाऊसच्या गॅलरीमधून त्यांनी शेकडो नागरिकांना अभिवादन केले. ट्रम्प यांनी अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणच्या एकत्रीकरणामध्ये सहभागी होऊ नये, अशी सूचना आरोग्य विभागाने दिलेली आहे.

विशेषतः ट्रम्प यांना स्वतःला करोनाची लागण झालेली असताना आणि व्हाईट हाऊसमधील अनेक कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झालेली असताना त्यांनी नागरिकांमध्ये मिसळणे योग्य नाही, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

मात्र ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या गॅलरीमधून नागरिकांना अभिवादन केले आणि आपल्या निवडणूक प्रचारामध्ये थेट सहभागी होण्याचे सूतोवाचही केले. ट्रम्प यांना झालेला संसर्ग आता इतरांसाठी संसर्गजन्य राहिलेला नाही, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. सिएन कॉन्ली यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.