नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान येत्या 21 सप्टेंबरला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी मोदी ह्यूस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ या मेगा शोला संबोधित करणार असून, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प देखील त्यांच्या बरोबर उपस्थित राहणार आहे.
The special gesture of President @realDonaldTrump to join us in Houston highlights the strength of the relationship and recognition of the contribution of the Indian community to American society and economy. #HowdyModi
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2019
दरम्यान, ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात मोदींच्या भाषणाशिवाय भारत आणि अमेरिकेचे संबंध दर्शवणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडणार आहे. तसेच हजारो भारतीय नागरिक देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.