डोनाल्ड ट्रम्प यांचा टीआरपी घसरला

वाशिंग्टन, दि. 17 – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन आणि विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात प्रचंड चुरस आहे. मात्र आता समोर येत असलेल्या बातम्यांनुसार जनमत वेगाने बिडेन यांच्या बाजूने झुकत असल्याचे स्पष्ट होत आहे.

या दोन नेत्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री आठ ते नऊ दरम्यान प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांची जी आकडेवारी समोर आली आहेत, त्यातून बिडेन यांचे पारडे जड असल्याचे निदर्शनास येत आहे.

नीलसन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार बिडेन यांचा कार्यक्रम 1 कोटी 41 लाख लोकांनी पाहिला. मात्र तेच ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला केवळ 35 लाख लोकांनीच पसंती दर्शवली.

एकाच वेळी तीन नेटवर्क या कार्यक्रमाचे प्रसारण करणार होते. त्यामुळे ट्रम्प यांना जास्त दर्शक मिळतील असा अनुमान काढला गेला होता. प्रत्यक्षात त्यांना बिडेन यांच्यापेक्षा निम्मे प्रेक्षकांनीही उपस्थिती दर्शवली नाही.

दरम्यान, अमेरिकेच्या या निवडणुकीची जगभरात प्रचंड चर्चा असून आपापले हित ध्यानात घेत प्रत्येक व्यक्ती, राष्ट्र ट्रम्प अथवा बिडेन यांना समर्थन करताना दिसत आहेत. इस्त्रायलमध्येही या निवडणुकीचे वातावरण तापले असून ट्रम्प यांना विजयी करण्याचे आवाहन येथील रस्त्यांवर केले जात आहे.

इस्त्रायलमध्ये दुहेरी नागरिकत्व असलेल्यांची संख्या मोठी आहे. येथील अनेक नागरिकांकडे अमेरिकेचेही नागरिकत्व आहे. अमेरिकेच्या फ्लोरीडा प्रांतात त्यांची संख्या मोठी आहे व त्यांचा कल निवडणुकीत महत्वाचा ठरत असतो. जॉर्ज डब्लू बुश यांच्या विजयातही फ्लोरीडाच्या इस्त्रायली अमेरिकी नागरिकांची भूमिका निर्णायक ठरली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.