अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिल्याचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचा दावा
वॉशिंग्टन : आपले विरोधक असणाऱ्या डेमोक्रॅटीक पक्षांच्या नेत्यांच्या राजकीय चौकशीत सहकार्य करे पर्यंत युक्रेनची लष्करी मदत रोखून धरण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले होते, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने प्रकाशित केले आहे.
जॉन बोल्टन यांच्या अगामी पुस्तकातील काही भागतील संभाषणांचा संदर्भ देत हे वृत्त प्रकाशित केले आहे. अमेरिकन संसदेत ट्रम्प यांनी त्यांच्या वकीलांमार्फत दाखल केलेल्या युक्तीवादाला हे प्रकटीकरण छेद देणारे आहे. त्यामुळे बोल्टन आणि अन्य अधिकाऱ्यांना शपथ देऊन येत्या आठवड्यात त्यांची फेरजबाब घेतले जाण्याची शक्यता आहे.
युक्रेनला 11 सप्टेंबरला लष्करी मदत दिल्याच्या दुसऱ्या दिवशी बोल्टन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या चौकशीत सहकार्य देईपर्यंत राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनची मदत रोखण्याचे केलेले आरोप तपासण्याची आपल्याला इच्छा असल्याचे बोल्टन यांनी संसदेत सांगितले आहे.
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तावर अद्याप व्हाईट हाऊसने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.