ट्रम्प यांनी सुरू केली सन 2020 च्या निवडणुकीची प्रचार मोहीम

ओर्लान्डो: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची पुढचीही निवडणूक आपणच लढवणार असल्याचे घोषित केले असून त्यांनी त्यासाठीची प्रचार मोहीम सुरू केली आहे. हीं निवडणुक पुढच्या वर्षी म्हणजे सन 2020 साली होत आहे. काल एका जाहींरसभेद्वारे त्यांनी ही प्रचार मोहीम सुरू केली. त्यासभेला मोठा प्रतिसाद लाभला. सुमारे 20 हजार लोक तिथे उपस्थित होते.

यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले की अमेरिकेची अर्थव्यवस्था ही आता साऱ्या जगाचे प्रतिनिधीत्व करणारी अर्थव्यवस्था झाली आहे. विरोधी डेमोक्रॅट पक्षाला देशाचा विनाश करायचा आहे असा आरोपहीं त्यांनी यावेळी केला. मागच्यावेळी आपण जिंकलो होतो याहीवेळी आपणच जिंकणार आहोत आणि आपले सारे काम यावेळी आपण फत्ते करणार आहोत असे ते म्हणाले.

अमेरिकेला आपण पुर्वी कधीही नव्हती इतके सबळ बनवू असे नमूद करीत त्यांनी पुन्हा त्यांनी अमेरिका ग्रेट अगेनचा नारा दिला. त्यासाठीच आपण पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणाहीं त्यांनी केला. डेमोक्रॅट पक्षाच्या धोरणांवर त्यांनी यावेळी पुन्हा जोरदार टीका केली. ते म्हणाले की त्यांची सारी मोहींम ही द्वेषावर आधारीत आहे. ते तुम्हाला आणि देशाला नष्ट करण्याच्या तयारीत आहेत असा इशाराहीं त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.