वॉशिंग्टन – करोनाच्या संकटानं मेटाकुटीला आलेल्या अमेरिकेत जॉर्ज फ्लाइड यांच्या मृत्यूनंतर प्रचंड हिंसाचार उफाळला आहे. अमेरिकनं नागरीक रस्त्यावर उतरत पोलिसांनी केलेल्या कृत्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आहेत. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधान केले होते.
त्यावरून ह्यूस्टनचे पोलीस दलाच्या प्रमुखांनी ट्रम्प यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे. जर तुमच्याकडं सांगण्यासारखं काही नसेल, तर गप्प बसा, अशा शब्दात पोलीस अधिकाऱ्याने ट्रम्प यांना सुनावले आहे.
मिनियापोलीस शहरात जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत हिंसाचाराचा उद्रेक झाला.
उफाळून आलेल्या हिंसाचारावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत टीका केली होती. टेक्सास प्रातांतील मिनियापोलीस शहराच्या गव्हर्नरशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी बळाचा वापर करून हिंसाचार शांत करण्याचा सल्ला दिला होता.
याचवेळी त्यांनी मिनियापोलीसमधील राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कौतुक केले होते. आंदोलकांना एखाद्या पावाच्या तुकड्यासारखं चिरडून टाकले. असे ते म्हणाले होते. त्यावर पोलीस अधिकाऱ्याने अध्यक्षांना उद्देशून गप्प बसण्याची सूचना केली आहे.