नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री भारताकडे येण्यासाठी प्रयाण केले. आपल्या अलिशान एअरफोर्स वन या विमानातूनच त्यांनी आपण भारताकडे येण्यास निघालो असून भारत भेटीसाठी आपण कमालीचे उत्सुक आहोत अशा आशयाचा ट्विटर संदेश हिंदीतून प्रसारीत केला.
ट्रम्प यांनी त्यात म्हटले आहे की, हम भारत आने के लिए तत्पर है, हम रास्ते मे है, कुछही घंटोंमे हम सबसे मिलेंगे, असा संदेश त्यांनी प्रसारीत करीत भारताशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांचा अध्यक्ष झाल्यानंतरचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यासाठी ते आपल्या पत्नी आणि मुलगी व जावयासह भारतात आले आहेत. भारतात येताना त्यांचे विमान काही काळ जर्मनीत इंधन भरण्यासाठी थांबवण्यात आले होते तेथून ते थेट अहमदाबादला आले.