अमेरिकी कंपन्यांना चीन सोडण्याचा ट्रम्पयांचा आदेश

वॉशिंग्टन: चीनने नव्याने लावलेल्या आयातावरील शुल्काच्या नियमावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला सरळ सरळ इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, अमेरिकेतल्या कंपन्या ज्या चीनमध्ये कार्यरत आहेत, त्यांना चीन सोडण्याचे अपील करत आम्हाला चीनची गरज नाही. असे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, व्यापारयुद्धामुळे अमेरिकेची प्रगती संथ गतीनं सुरू असून, जागतिक अर्थव्यवस्थाही कमकुवत होत आहे. तर, शेअर बाजारांची स्थितीही फारशी चांगली नाही. ट्रम्प म्हणाले, आमच्या देशाला एवढ्या वर्षांत चीनमुळे खर्व डॉलरच नुकसान सोसाव लागल आहे. त्यांनी वर्षभरात अब्जो डॉलरच्या किमतीची आमची बौद्धिक संपदा लुटली आहे. त्यांना हे सुरूच ठेवायच आहे. परंतु आम्ही अस होऊ देणार नाही. आम्ही चीनमध्ये कार्यरत असलेल्या अमेरिकी कंपन्यांना तात्काळ तिथून निघून दुसऱ्या देशांचा पर्याय शोधावा, असं सांगितले आहे.

तत्पूर्वी, चीनने शुक्रवारी घोषणा केली होती की, अमेरिकेकडून आयात करण्यात येणाऱ्या 75 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर 10 टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. दुसरीकडे ट्रम्प सरकारने 15 ऑगस्टला घोषणा केली होती की, अमेरिका 300 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 10 टक्के अतिरिक्त आयात शुल्क आकारणार आहे. त्याच्या उत्तरादाखल चीनने अमेरिकेत तयार करण्यात येणारी वाहन आणि स्पेअर पार्टसवर 25 टक्के किंवा 5 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क 15 डिसेंबरपासून वसूल केले जाणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×