भारतीय वेळेनुसार काल रात्री १० वाजून ३० मिनिटांच्या सुमारास अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष होण्याची त्यांना दुसऱ्यांदा संधी मिळली आहे. त्यानुसार डोनाल्ट ट्रम्प हे अमेरिकेचे अधिकृतपणे राष्ट्रध्यक्ष झाले आहेत. मोठ्या उत्साही वातावरणात ट्रम्प यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी समारंभाला विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच अनेक कार्यकारी आदेशांवर सह्या केल्या आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटेनच्या (WHO) सदस्यत्वातून अमेरिकेने माघार घेण्याच्या आदेशाचाही समावेश आहे.
शपथ घेतल्यानंतर ट्रम्प ओव्हल ऑफिसमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी अनेक कार्यकारी आदेशांवर सह्या केल्या. त्यांनी माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने घेतलेले ७८ मोठे निर्णय रद्द केले आहेत. यासोबतच पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने माघार घेतल्याची घोषणा त्यांनी केली.
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट सरकार
राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी मा. राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या सरकारवर सडकून टीका केली. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वांत वाईट सरकार होते, अशी जळमळीत टीका त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केली. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर ते म्हणाले की, आम्ही कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार आहोत. सर्व प्रथम, मी मागील सरकारने घेतलेले विनाशकारी निर्णय रद्द करेन, असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी या फायलींवर सह्या केल्या. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात वाईट सरकार होते, असे देखील ते म्हणाले.
ट्रम्प यांनी शपथ घेताच या फायलींवर सही केली
6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलवर झालेल्या हल्ल्यातील दोषी असलेल्या 1500 लोकांना माफी.
ड्रग्ज कार्टेलला दहशतवादी संघटना घोषित केले जाईल.
अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरून बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करणाऱ्या लोकांपासून अमेरिकन लोकांना संरक्षण दिले जाईल.
मेक्सिको आणि कॅनडावर 25 टक्के शुल्क लागू केले जाईल. याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून होऊ शकते.
अमेरिका पॅरिस हवामान करारातून बाहेर पडेल.
फेडरल सरकारमधील नियुक्त्या गुणवत्तेवर आधारित असतील.
सरकारी सेन्सॉरशिप संपुष्टात येईल आणि अमेरिकेत भाषण स्वातंत्र्य पुनर्संचयित केले जाईल.
अमेरिकेत थर्ड जेंडर अवैध घोषित.
अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर.
राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणीची घोषणा.
इलेक्ट्रिक वाहनाचा अनिवार्य वापर (EV) रद्द केला.
अमेरिकेत जन्माने मिळणारे नागरिकत्व संपुष्टात येईल.
अमेरिकेत टिक टॉकचे 75 दिवसांचे आयुष्य मिळणार