वॉशिंग्टन- अमेरिकेत करोनामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी झाली आहे. एच-1बी व्हिसाच्या आधारे ‘आयटी’ क्षेत्रात बहुसंख्य भारतीय तरुणांनी अमेरिकेत रोजगार मिळवला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी H-1B व्हिसावर 2020 च्या अखेरपर्यंत निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. २३ जूनपासून हा आदेश लागू होणार आहे. आता या निर्णयावर अॅमेझॉन, अॅपल, टेस्ला या अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काही विषयांवर काम करणाऱ्या इलॉन मस्क यांनी सुद्धा ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘कुशल परदेशी मनुष्यबळामुळे खरंतर अमेरिकेत नोकऱ्यांची निर्मिती होते. मला सुद्धा हा निर्णय पटलेला नाही’ असे मस्क यांनी म्हटले आहे. व्हिसा स्थगित करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध करताना, काहीजणांनी पुढचा इलॉक मस्क टेस्ला, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांची निर्मिती अमेरिकेत नाही दुसऱ्या ठिकाणी करेल असा इशारा दिला आहे.
तत्पूर्वी,या निर्णयावर भारतीय-अमेरिकन वंशाचे गुगल आणि अल्फाबेट या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी व्यक्त केली आहे.