अहमदाबाद -अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवस भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ते खाणार काय?, शाकाहारी खाणार की मांसाहारी खाणार?, यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
ट्रम्प यांच्यासाठी खास गुजराती स्टाईल मध्ये जेवण तयार करण्यात येणार आहे. त्यात फॉर्च्युनर सिग्नेचर कुकीज, खमण ढोकळा आणि ब्रोकली कॉर्न समोसा या पदार्थांचा समावेश आहे. फॉर्च्युन लॅंडमार्क हॉटेलचे शेफ सुरेश खन्ना यांना ट्रम्प यांचे कुटुंब आणि पंतप्रधान मोदींसाठी जेवण तयार करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड कुशनेर यासगळ्यांसोबत भारत दौरा करणार आहेत. त्यात ते भारतातील अहमदाबाद, आग्रा आणि दिल्ली या तीन शहरांना भेट देणार आहे.