वॉशिंग्टन – करोनामुळे जगाची सारी अर्थव्यवस्थाच ठप्प असून आता या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थकारणाची स्थिती कशी सुधारायची यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वच महत्त्वाच्या देशांतील नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. शुक्रवारी त्यांना करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रयत्नांमध्ये जी 7 आणि जी 20 देशांची मदत घेण्याची सूचना राजे सी सौदी अरेबिया आणि जर्मनीच्या नेत्यांशी फोन वरून चर्चा केली. सौदीचे राजे सलमान बिन अल सौद यांच्याशी त्यांनी जागतिक इंधन बाजारातील स्थैर्याविषयी चर्चा केली. यावर दोन्ही देशांनी संयुक्तपणे उपाययोजलमान यांनी केली.
जर्मनीच्या अँजेला मार्केल यांच्या बरोबरच्या चर्चेत त्यांनी आर्थिक स्थिती बरोबरच करोनावरील औषधांच्या संशोधनावरही चर्चा केली. या संशोधनाला संयुक्तपणे चालना देण्याचा मनोदय या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांनाही फोन कॉल करून त्यांच्याशी सद्य स्थितीवर चर्चा केली.
ठप्प झालेले जागतिक अर्थकारण वेगाने पुन्हा सुरू करण्यास अमेरिकेसह सर्व प्रमुख देशांचे प्राधान्य आहे. करोनाचे अस्तित्व कायम असताना इकॉनामी ओपन करण्यासाठी कोठून सुरूवात केली पाहिजे याचा अंदाज अध्यक्ष ट्रम्प हे सातत्याने घेत आहेत. त्यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था खुली करण्याचा आदेश या आधीच दिला आहे.