ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्या व्यक्तीला ८० मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर

नवी दिल्ली – इराणी कमांडर कासम सुलेमानी याच्या मृत्यूनंतर इराण आणि अमेरिकेत संघर्षाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शिरच्छेद करणाऱ्या व्यक्तीला ८० मिलियन डॉलरचे बक्षीस इराणने जाहीर केले आहे.

ट्रम्प यांचे शिरच्छेद करण्यासाठीच्या बक्षिसाची रक्कमेसाठी संस्थांनी इराणी नागरिकांना एक डॉलर दान करण्याचे आवाहन केले होते. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सुलेमानीचा मृत्यूनंतर सातत्याने ट्विट करत इराणला इशारा देत आहे. शिरच्छेदाच्या वृत्तेनंतरही, जर इराणने कोणत्याही यूएस प्रतिष्ठित अथवा अमेरिकन नागरिकाला नुकसान पोहचवल्यास शक्तिशाली हल्ल्याने याचे प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे.

दरम्यान, अमेरिकेने बगदादमध्ये हल्ला करून इराणच्या लष्कराचे एक वरीष्ठ अधिकारी मेजर जनरल कासेम सोलिमनी यांची हत्या घडवून आणली आहे. यानंतर इराण आक्रमक झाले असून त्यांच्या अण्वस्त्र विकास कार्यक्रमासंबंधी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २०१५ मध्ये झालेल्या अण्वस्त्र करारानुसार इंधनाच्या समृद्धीकरणावर निर्बंध होते. मात्र, त्या निर्बंधांचे पालन न करण्याची भूमिका इराणने घेतली आहे. या निर्णयामुळे जगाची चिंता वाढणार आहे. सध्या जगभरातून आखातात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.