मुंबई – बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दोघेही पुढच्या आठवड्यात 6 तारखेला राजस्थानमधील जैसलमेरमध्ये लग्न करणार आहेत. अशा परिस्थितीत लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सूर्यगड पॅलेस पूर्णपणे सजला आहे. त्याचवेळी, आता बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतने सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियारासाठी एक खास पोस्ट केली आहे.
कंगना राणावतने इंस्टाग्राम स्टोरीवर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यांच्या प्रेमाचे कौतुक केले. कंगनाने लिहिले की, “हे कपल खूप सुंदर आहे…चित्रपटसृष्टीत खरे प्रेम क्वचितच पाहायला मिळते. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत”. यासोबतच कंगनाने सिद्धार्थ आणि कियारा यांनाही टॅग केले आहे. कंगनाची ही इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
5 तारखेपासून सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे प्री-फंक्शन होणार आहे अशी चर्चा सुरु आहे. दोघांच्या लग्नात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.सिद्धार्थ आणि कियारा अडवाणीने ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केले होते. तेव्हापासून दोघांची जवळीक वाढू लागली. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते आता दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत.