शिवमोगा – खाणीसाठी सुरुंगाचा साठा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा स्फोट होऊन किमान 10 जण मरण पावले. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की सभोवतालचा सारा परिसर हादरला. शिवमोगा जिल्ह्यातील अबलगिरी गावात हा स्फोट झाला.
या स्फोटामुळे शेजारच्या चिकमंगळूर आणि दावणगिरी जिल्ह्यातील परिसरही हादरला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात झालेल्या या स्फोटातील जीवितहानीबाबत शोक व्यक्त केला. जखमींना लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना करत आहे. राज्य सरकार आपत्तीग्रस्तांना सर्व मदत करत असल्याचे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या मतदारसंघातील हे गाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर पोहोचणे शुक्रवारी दुपारपर्यंत कोणालाही शक्य नव्हते. या स्फोटाने या भागातील घरांच्या खिडक्यांची तावदाने उडून पडली. अनेक घरांना आणि अगदी रस्त्याला ही भेगा पडल्या. त्यामुळे भूकंप झाल्याची अफवा त्या भागात पसरली. मात्र भूगर्भ तज्ज्ञांनी कोणत्याही भूकंपाची नोंद झाली नसल्याचे स्पष्ट केले.
शिवमोगाच्या जवळ हनसूर गावात स्फोट झाला आहे. कोणताही भूकंप झाला नाही. ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, असे पोलिसांनी सांगितल्याचे पीटीआयच्या बातमीत म्हटले आहे. अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या महितीनुसार, ट्रकमध्ये असलेल्या जिलेटिनचा स्फोट झाल आहे. या ट्रकमधून सहा मृतदेह मिळाले आहेत. या स्फोटामुळे आजूबाजूचा सारा परिसर हादरून गेला.
खाण कामामसाठी जे जिलेटीन नेण्यात येत होते. यातव या वाहनाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मृतदेहांची अवस्था ओळखण्याच्या पलीकडे आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर जाण्याचा प्रयत्नात आहेत.