ट्रक चालकाला ठोठावला चक्क 2 लाख 500 रुपयांचा दंड

नवी दिल्ली  – केंद्र सरकारने लागू केलेल्या मोटार वाहन कायद्याअंतर्गत चलान फाडण्याचे नवे नवे विक्रम पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी तब्बल लाखांच्या घरात चलान फाडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता नवी दिल्लीत एका ट्रक चालकाने नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात 2 लाख 500 रुपयांचे चलान फाडल्याचे समोर आले आहे. आतापर्यंतचा हा विक्रमी दंड आहे.

ट्रक मालकाने दंडाची ही रक्कम भरली देखील आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवी दिल्ली वाहतूक पोलिसांनीकडून ही कारवाई करण्यात आली होती. ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा अधिक सामान, चालकाकडे परवाना नसणे आणि वाहनाची कागदपत्रे (ठशसळीीींरींळेप उशीींळषळलरींश) नसल्यामुळे तब्बल 2 लाख 500 रुपयांचे चलान फाडण्यात आले होते. चालक ट्रक चालवण्यासाठी तंदूरस्तही नव्हता अशीही नोंद वाहतूक पोलिसांनी नोंदवली होती.

यापूर्वी राजस्थानमधील एका ट्रक मालकाविरुद्ध दिल्ली वाहतूक पोलिसांनी अशीच मोठ्या दंडाची कारवाई केली होती. परवान्यापेक्षाही अधिक सामान भरल्याप्रकरणी तसेच अन्य नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका ट्रक मालकाविरुद्ध जवळपास 1 लाख 40 हजार 700 रुपयांचे चलान फाडण्यात आले होते. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी रोहिणी कोर्टामध्ये संबधित ट्रक मालकाने दंडाची रक्कम कोर्टात भरली होती.

नव्या वाहतूक नियमांने देशभरात वाहन चालकांना हैराण करुन सोडले आहे. अनेक ठिकाणी 10 ते 25 हजारांपर्यंत चलान फाडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. गुजरात राज्य सरकारने केंद्राच्या दंडात्मक रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तर महाराष्ट्र सरकारने नव्या वाहतूक नियमांच्या अमंलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×