खेड घाटात ट्रक पेटला

दावडी -पुणे-नाशिक महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास खेड घाटात वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले; मात्र संपूर्ण ट्रक आगीत जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.

पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगरच्या दिशेने येणाऱ्या या ट्रकने अचानक पेट घेतला. काही वेळात आगीने रौद्ररुप धारण केले. या घटनेत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. यावेळी राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाची गाडीने आग आटोक्‍यात आणली.

आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. पहाटेच्या सुमारास आग लागल्याने या मार्गावर कमी संख्येने वाहने होती. महामार्गावरुन तुरळक वाहतूक असली तरी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here