अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये 4 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींवर उत्तर प्रदेशच्या मौरानीपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या पंजवाह येथून प्रवाशांना घेऊन कार खैरी खुरौडा येथे जात होती. गुरसराय-मऊरानीपूर मार्गावर राजपूरजवळ कार पोहतचाच समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला धडक दिली. हा अपघात ऐवढा भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 86 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी लाख आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.