बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या कार अपघातात गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी बॉलीवूडसह चाहत्यांनी प्रार्थना केली आहे. यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाही आहे. तिने आपल्या अकाऊंटवर ट्विट केले आहे. पण या ट्विटवरून तिला ट्रोल करण्यात आले.
The news of @AzmiShabana Ji’s injury in an accident is distressing. I pray for her quick recovery.
— URVASHI RAUTELA?? (@UrvashiRautela) January 18, 2020
शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात अस्वस्थ करणारा आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असे ट्विट उर्वशीने इंग्रजीमधून केले होते. पण असेच ट्विट एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी तिला तुफान ट्रोल केले आहे. उर्वशीने केलेले ट्विट हे कॉपी केल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, उर्वशी रौतेला वयाच्या 15व्या वर्षीच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिने मिस युनिव्हर्समध्ये देखील भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय उर्वशी रौतेलाने यो यो हनी सिंगच्या म्युझिक व्हिडिओ लव डोसच्या माध्यमातूनही बरीच प्रसिद्धी मिळविली होती.
तसेच ती लवकरच चन्ना वे गाण्यात दिसणार आहे. अलीकडेच या गाण्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. यातील तिचा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.