“सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे ” म्हणणाऱ्या चित्रा वाघ नेकऱ्यांकडून ट्रोल

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेला जनादेश हा भाजपा-शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम अशा सर्व घटक पक्षांना होता. तथापि सरकार बनविण्यासाठी शिवसेना राजी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!, असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सत्ता स्थापन करणरा नाही असे स्पष्ट केले होते.

भाजपाच्या या भूमिकेचे स्वागत करताना भाजपाचे नेत्या चित्रा वाघ यांनी सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे म्हणत या निर्णयाचे स्वागत केले. मात्र याच वक्तव्यावरुन राष्ट्रवादीने चित्रा वाघ यांना सुनावले आहे. एवढेच नाही तर नेटकऱ्यांनीदेखील वाघ यांना ट्रोल केले.

भाजपाला सत्ता स्थापनेसाठी शनिवारी रात्री राज्यपालांनी आमंत्रण दिल्यानंतर रविवारी भाजपाने शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील ट्विट महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले हेच. ट्विट कोट करत चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे अभिमानास्पद निर्णय!,असे ट्विट वाघ यांनी केले होते. दरम्यान, राज्यामध्ये शिवसेना दोन्ही कॉंग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन करणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here