Triptii Dimri : अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर स्टारर ‘अॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील सुपरहिट एक्शन, गाणे आणि थ्रिलच्या जोरावर ‘अॅनिमल’ प्रेक्षांच्या मनात घर करून गेला. सिनेमात काही नवीन चेहरे देखील पाहायला मिळाले होते.
अभिनेत्री ‘तृप्ती डीमरी’ या चित्रपटातून रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. सिनेमातील बोल्ड सिन मुळे अभिनेत्रीची लोकप्रियता रातोरात गगनाला भिडली. सोशल मीडियावर सुद्धा ‘तृप्ती डीमरी’ची चांगलीच चर्चा झाली होती. तिचा चाहता वर्ग देखील लाखोंच्या घरात झाला आहे.
अश्यातच, आता अभिनेत्रीने ‘IMDb’यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. 5 डिसेंबर रोजी, ‘IMDb’ने 2024 च्या टॉप 10 सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार्सची यादी जाहीर केली आणि या यादीनुसार, तृप्ती डीमरीने अव्वल स्थान पटकावले आहे.
अभिनेत्रीने दीपिका पदुकोण, इशान खट्टर, शाहरुख खान, शोभिता धुलिपाला, शर्वरी, ऐश्वर्या राय बच्चन, समंथा, आलिया भट्ट आणि प्रभास यांच्या पाठोपाठ अनेक मोठी नावे मागे टाकली आहेत. 2024 च्या टॉप 10 सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार्सच्या यादीमध्ये तृप्ती डीमरी चांगलीच चर्चत ठरली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना, तृप्तीचा कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “आम्हाला अभिमान वाटतो” त्यानंतर नझर ताबीज, सनग्लासेस चेहऱ्यावर आणि टाळ्या वाजवणारे इमोजी असं शेअर केलं आहे. सॅमने अभिनेत्रीला सहाय्यक म्हणून प्रमोट केल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील सॅम मर्चंटने तिच्यासाठी अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.
View this post on Instagram
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, सॅम मर्चंट कासा वॉटर्स, लक्झरी व्हीआयपी निवास आणि एव्होर गोवाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी, त्याने गोव्यातील विदेशी बीच क्लब आणि हॉटेल्सच्या व्यवसायात येण्यापूर्वी एक मॉडेल म्हणून काम केले होते.
दरम्यान, उत्तराखंडची रहिवासी असलेल्या तृप्ती डीमरीने 2017 मध्ये श्रेयस तळपदेच्या ‘पोस्टर बॉईज’ या कॉमेडी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर आणखी काही चित्रपट केले, पण यश मिळाले नाही.
पण ‘बुलबुल’ चित्रपटाने तृप्ती डिमरी ला प्रसिद्धीच्या झोतात आणले. आणि मग ‘ॲनिमल’ने तृप्ती डिमरी यांना रातोरात स्टार बनवले. सध्या तिच्याकडे 4 चित्रपट आहेत, ज्यामध्ये ‘धडक 2’ व्यतिरिक्त ‘वाईट न्यूज’, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ यांचा समावेश आहे.