Shahid Kapoor & Tripti Dimri | अभिनेत्री तृप्ती डिमरी पहिल्यांदाच शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘अर्जुन उस्तरा’ या ॲक्शनपटात हे दोघे स्क्रीन शेअर करणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. तृप्ती डिमरी आणि शाहिद कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने चाहते देखील त्यांना पाहण्यासाठी आतुर आहेत.
या चित्रपटासाठी एक मोठा स्टुडिओ बांधण्यात आले आहे. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा हा चित्रपट स्वातंत्र्योत्तर काळातील अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.या चित्रपटाचे शूटींग लवकरच पूर्ण करून 2025 मध्येच रिलीज करण्याचा निर्माते प्रयत्न करत आहेत.
तृप्ती डिमरी अॅनिमल या चित्रपटामुळे चांगलीच ट्रेंडमध्ये राहिली. अभिनेत्रीला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रशंसा देखील मिळाली. आता ती 2025 साठी तयारी करत आहे. तिच्या प्रभावी कामगिरीने तिला IMDb च्या टॉप-रेट केलेल्या अभिनेत्रींमध्ये देखील स्थान मिळवून दिले आहे. Shahid Kapoor & Tripti Dimri |
अभिनेत्री तृप्ती डिमरीने ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ’, ‘बॅड न्यूज’ आणि ‘भूल भुलैया 3’ सह अनेक सुपरहिट चित्रपट 2024मध्ये केले आहेत. दुसरीकडे शाहिद कपूरने २०२४ मध्ये ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात भूमिका साकारली. आता हे दोघे ‘अर्जुन उस्तरा’मधून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. Shahid Kapoor & Tripti Dimri |