करोनाच्या साथीमुळे नैराश्‍यामध्ये तिप्पट वाढ

लंडन – कोविड-19 च्या साथीमुळे लागू झालेल्या शटडाऊनमुळे जगभरात लोकांचे नैराश्‍य आणि चिंतेमध्ये तिप्पट वाढ झाली आहे, असा निष्कर्ष नवीन अभ्यासामध्ये काढण्यात आला आहे. ब्रिटन, ऑस्ट्रिया आणि बेल्जियम या तीन देशांमधील तज्ज्ञांच्या पथकाने मिळून केलेल्या अभ्यासामध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.

ब्रिटनच्या सामाजिक-आर्थिकदृष्ट्य‌ा वंचित असलेल्या भागात नैराश्‍याचे प्रमाण अधिक तीव्र आहे. हे दर्शवणाऱ्या मानसिक तंदुरुस्तीमधील प्रादेशिक भिन्नतेवरही या अभ्यासामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.

कोविड-19 च्या साथीपूर्वी लोकांमधील नैराश्‍य आणि चिंतेच्या समस्येचे प्रमाण 17 टक्‍क्‍यांइतके होते. मात्र एप्रिल महिन्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही समस्या तिपटीने म्हणजे 52 टक्‍क्‍यांनी वाढली.

त्यातही बेरोजगार झालेल्या किंवा उत्पन्न घटलेल्या महिला आणि युवा वर्गामध्ये हे नैराश्‍येचे प्रमाण अधिक वाढले असल्याचे या अभ्यासामध्ये म्हटले आहे. ब्रिटनमधील शेफिल्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचाही सहभाग या अभ्यासामध्ये आहे. या अभ्यासातील निष्कर्श ‘सायकोसोमॅटिक मेडिसीन’ या वैज्ञानिक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केला गेला आहे.

मानसिक आरोग्याशी संबंधित एका प्रश्‍नाकडे आम्ही तातडीने लक्ष वेधत आहोत, असे युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्डमधील मानसशास्त्र विभागातील डॉ. जेरनी डेल्गाडिलो आणि सायकोलॉजी थेरपीज रिसर्च आणि दक्षिण हंबर एनएचएस फौंडेशन ट्रस्टचे संचालक रोथरॅम डोन्कास्टर यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.