तिहेरी तलाक विधेयक हे ‘असंविधानिक’ – असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली – तिहेरी तलाक पद्धतीला बेकायदेशीर ठरवणाऱ्या ऐतिहासिक विधेयकाला काल राज्यसभेत मंजूरी देण्यात आली आहे. तिहेरी तलाकवर बंदीच्या विधेयका काल दिवसभर जोरदार चर्चा झाली. मतविभाजनानंतर विधेयकाच्या बाजूने 99 तर विरोधात 84 अशा मतांनी राज्यसभेने हे विधेयक मंजूर केले. त्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी हे विधेयक असंविधानिक असल्याचे म्हटले आहे.

या ऐतिहासिक निर्णयावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसीं म्हणाले की, ‘तिहेरी तलाक विधेयक असंवैधानिक आहे आणि मला आशा आहे की ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देतील’.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.