सांगलीत तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून आई-वडीलांसह बहिणीची हत्या
सांगली : पोटाच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांसह बहिणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगलीच्या जत तालुक्‍यातील उमदी येथे ही घटना घडली. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुलानेच आपल्या वृद्ध आई-वडिलांची आणि बहिणीची हत्या केल्याने सांगली जिल्हा हादरला आहे. या घटनेचे वृत्त ऐकून सारेच सून्न झाले आहेत.

गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (82), नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (75) आणि समुद्राबाई बिरादार (62) अशी मृतांची नावे आहेत. संशयित आरोपी सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (58) याने हे तिहेरी हत्याकांड केल्याचे समोर आले आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून घटनास्थळी उमदी आणि जत पोलीस दाखल झाले आहेत.

हा हत्याकांडाचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गावकरी तसेच नातेवाईकही दाखल झाले असून काहीसे तणावाचे वातावरण आहे. अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.