मैदानी स्पर्धेत केविनला तिहेरी मुकुट

पुणे: सेंट व्हिन्सेंट स्कूलच्या केविन चटर्जीने पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा परिषदने आयोजित केलेल्या शालेय मैदानी स्पर्धेत चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात तिहेरी मुकुट पटकावला.

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत पार पडलेल्या या स्पर्धेत केविनने 100 व 200 मीटर शर्यतीत आणि लांब उडीत प्रथम क्रमांक पटकावला. केविनने 100 मीटर शर्यतीत 12.69 सेकंद वेळ नोंदवीत वेगवान धावपटूचा मान मिळविला. सेंट जोसेफ स्कूलच्या सोहेल शेखने दुसरा, तर आर्मी पब्लिक स्कूलच्या अर्पित शर्माने तिसरा क्रमांक मिळविला.

200 मी. शर्यतीत केविनने 27.12 सेकंद वेळ नोंदवली. अथर्व चत्तरने दुसरा, तर राजस नंदाने तिसरा क्रमांक मिळविला. लांब उडीत केविनने 5.03 मीटर कामगिरी नोंदविली. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या वेदांत पुरीने दुसरा, तर हचिंग्जच्या श्रेयस जाधवने तिसरा क्रमांक मिळविला.

निकाल : 14 वर्षांखालील मुले : 400 मी. धावणे : वेदांत पुरी – 59.8 से. (सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव), रोहित वर्मा (मनपा शाळा क्र. 171 विद्यानिकेतन), राजस नंदा (डी.ए.व्ही.). 600 मी. धावणे : रोहित वर्मा – 1 मि.40.8 से. (मनपा शाळा क्र. 171), श्‍लोक पाटील (सेंट मेरीज स्कूल), श्‍लोक तोगारगे (विद्याशिल्प स्कूल). 80 मी. हर्डल्स : ओम मेमाणे – 14.24 से. (सिंहगड स्कूल), शंतनू आवारी (मुक्तांगण), शोधन पुजारी (हचिंग्ज).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here