आजच जाहीर झालेल्या सीबीएसई इयत्ता १०वीच्या निकालात ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश व उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
यावेळी बोलताना ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. रुपाली ढमढेरे म्हणाल्या, “आमच्यासाठी हा खरंच खास दिवस आहे कारण आमचे १२वीचे विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. आमच्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व चिकाटीचे फळ आज आम्हाला मिळाले आहे. येत्या बॅचसाठी त्यांनी एक बेंचमार्क सेट केल्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर आनंदी आहोत.”
ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी ९८% गुणांनी उत्तीर्ण झाला असून सायन्स विभाग व कॉमर्स विभागाने चांगले प्रदर्शन केले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील स्कूलचा निकाल हा १००% लागला असून, स्कूलसाठी हा अभिमानाचा दिवस ठरला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन व त्यांना मार्गदर्शन करून हे यश स्कूलला लाभले आहे.
ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थी, त्यांचे कुटुंब आणि शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते, ज्यांनी या यशात योगदान दिले व मागील दोन वर्ष कठोर परिश्रम केले.
ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल मध्ये दोन्ही विभागात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे व गुणांची टक्केवारी खालील प्रमाणे.
ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी :
सायन्स विभाग – सुकेतू दत्ता: ९८.२%
कॉमर्स विभाग – ताहेर मुफद्दल दाभिया: ८८%