टीकेआरला कॅरेबियन लीगचे अजिंक्‍यपद

जमैका – वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या कॅरेबियन प्रीमिअर लीग टी-20 स्पर्धेत त्रिन्बॅगो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने अजिंक्‍यपद मिळवले. या स्पर्धेत टीकेआर संघाने सलामीच्या सामन्यापासून अंतिम लढतीपर्यंत अजिंक्‍य राहण्याचा विक्रम केला. या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेला टीकेआरचा कर्णधार कॅरन पोलार्ड स्पर्धेचा मानकरी ठरला तर, 84 धावांची वादळी खेळी करणारा लेनली सिमन्स सामन्याचा मानकरी ठरला. 

टीकेआर संघाने सेंट ल्युसिया संघाचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात ल्युसिया संघाने टीकेआरसमोर विजयासाठी ठेवलेले 155 धावा करण्याचे आव्हान केवळ 2 गडी गमावून पार केले. त्यात लेनली सिमन्सने नाबाद 84 धावांची वादळी खेळी केली.

सिमन्सने ड्‌वेन ब्राव्होला साथीला घेत संघाचा विजय साकार केला. सिमन्सने 49 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 84 धावा केल्या. ब्राव्होने 47 चेंडूत 2 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली.

प्रेक्षक नसल्याचा फटका 

करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र, त्याचा फटका सर्व संघातील खेळाडूंना बसला. चौकार किंवा षटकार फटकावला गेल्यावर पूर्वी स्टॅण्डमध्ये असलेले प्रेक्षक चेंडू शोधून परत खेळाडूंकडे देतात हे आपण पाहतो. मात्र, प्रेक्षकच नसल्याने चेंडू स्टॅण्डमध्ये गेला की क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघातील खेळाडूंनाच तो शोधावा लागत होता. प्रेक्षकांशिवाय सामने जोपर्यंत होत राहतील त्या प्रत्येक वेळी हेच चित्र दिसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.