तृणमुल खासदारांना जीवे मारण्याच्या धमक्‍या

कोलकाता – गेल्या काही दिवसांपासून अज्ञात कार्यकर्त्यांकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्‍या येत असल्याची तक्रार तृणमुल कॉंग्रेसचे राज्यसभेचे सदस्य शंतनू सेन यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणत्या कारणावरून या धमक्‍या दिल्या जात आहेत त्यावर मात्र त्यांनी काही भाष्य केलेले नाही. त्यांनी सांगितले की फोनवरून या धमक्‍या सातत्याने येत असून अलिकडच्या काळात तर हे प्रमाण खूपच वाढले आहे त्यामुळे आपण त्या विषयी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या 9 फेब्रुवारी राजी तृणमुल कॉंग्रेसचे आमदार सत्यजीत विश्‍वास यांची सरस्वती पुजा कार्यक्रमातच नाडिया जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आपल्याला येणाऱ्या धमक्‍यांचे कॉल वाढले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुरूवातीला आपण या धमक्‍यांकडे फार लक्ष दिले नाही, पण नंतर मात्र हा विषय आपण गांभीर्याने घेतला आहे असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.