कोलकता – पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघात आज बहुप्रतीक्षित पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. त्यावर त्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे भवितव्य अवलंबून आहे.
याच मतदार संघात टीएमसी आमदार मदन मित्रा यांनी एका बूथवर जाणीवपूर्वक मतदान यंत्र बंद केल्याचा आरोप केला. हा आरोप भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांनी केला आहे.
तिब्रेवाल पत्रकरांशी बोलतांना म्हणाल्या, ‘भाजप नेत्या मदन मित्रा यांनी बूथवर जाणून हेतुपुरस्सर मतदान यंत्र बंद केले आहे. भाजप पक्षाला बंगाल सरकार घाबरत आहे. असेही त्या म्हणाल्या आहे.”
दरम्यान, आमदार बनण्याची संधी ममता बॅनर्जी यांना भवानीपूरमधील पोटनिवडणुकीमुळे मिळाली आहे. त्यामुळे त्या पोटनिवडणुकीकडे बंगालबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ममतांविरोधात भाजपच्या प्रियांका टिबरेवाल आणि माकपचे श्रीजिब बिस्वास निवडणूक लढवत आहेत. त्या पोटनिवडणुकीचा निकाल 3 ऑक्टोबरला जाहीर होईल.
दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर भवानीपूर मतदारसंघात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेसाठी केंद्रीय दलांच्या 15 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.