नवी दिल्ली- लोकसभेत आज महागाईवर चर्चा सुरू झाली. यावेळी तृणमुल कॉंग्रेसच्या महिला सदस्य काकोली घोष यांनी अनोख्या पद्धतीने महागाईचा निषेध केला. त्या म्हणाल्या की आज गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत, तेलाच्या किंमती वाढल्या आहेत सरकार आम्हाला आता याद्वारे कच्चा भाज्या खायला भाग पाडत आहे, असे नमूद करुन त्यांनी आपल्या पर्स मधून कच्चे वांगे सभागृहात काढले आणि ते कच्चे वांगे चावत त्यांनी महागाईचा निषेध केला.
त्या म्हणाल्या की गेल्या सहा महिन्यात चारवेळा सरकारने गॅसच्या किंमती वाढवल्या. या किंमती आता सहाशे रूपयांवरून अकराशे रूपयांवर गेल्या आहेत. सरकारने गुपचुप गॅसची सबसिडी काढून घेतली असून सामान्य लोकांना आता अत्यंत महागड्या दराने गॅस सिलिंडर घ्यावा लागतो, तो त्यांना परवडत नाही. आता आम्ही काय भाज्या कच्च्याच खायच्या काय असा सवाल त्यांनी सरकारला केला.