आमदार शताब्दी रॉयही सोडणार तृणमुल कॉंग्रेस?

कोलकाता – तृणमुल कॉंग्रेस पक्षाच्या वीरभूम येथील खासदार शताब्दी रॉय याही पक्षाला रामराम ठोकण्याच्या विचारात आहेत असे सांगितले जात आहे. आज त्यांनी आपल्या ट्‌विटरवर शनिवारी निर्णय घेणार असे वाक्‍य प्रसारीत केले आहे त्यावरून ही अटकळ बांधली जात आहे.

अभिनेत्री असलेल्या रॉय यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे की, आपल्या मतदार संघात पक्षाचे जे कार्यक्रम होतात त्याची आपल्यालाच कल्पना दिली जात नाही. हा प्रकार मनस्ताप देणारा ठरत आहे. शताब्दी रॉय या पक्षाच्या तीन वेळा निवडून आलेल्या खासदार आहेत. त्या सध्या दिल्लीला गेल्या असून त्यांनी म्हटले आहे की आपला निर्णय आपण शनिवारी दुपारी 2 वाजता जाहीर करणार आहोत.

शताब्दी रॉय यांचे तृणमुलचे जिल्हाध्यक्ष अनुव्रत मोंडाल यांच्याशी मतभेद आहेत. त्यांनी म्हटले आहे की आपले आपल्या मतदार संघाशी अत्यंत चांगले संबंध आहेत. पण आपल्याला न सांगताच आपल्या मतदार संघात पक्षाचे कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे मला तिथे उपस्थित राहता आलेले नाही. लोक मला तुम्ही गैरहजर का असता असे विचारात, त्यावेळी त्यांना उत्तर देणे मला अवघड होऊन बसते असेही त्यांनी म्हटले आहे.

या साऱ्या प्रकारांचा आपल्याला खूप मनस्ताप झाला आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. गेल्या दहा वर्षात आपण आपल्या कुटुंबियांना जेवढा वेळ दिला नाही त्यापेक्षा अधिक वेळ आपण आपल्या मतदार संघातील नागरीकांना दिला आहे. ही बाब आपले शत्रु देखील मान्य करतील. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर मला आता काही निर्णय घेणे भाग पडणार आहे. त्याची माहिती मी मतदार संघातील नागरीकांना शनिवारी देईन. आपल्या मतदार संघातील लोक यापुढेही मला पाठिंबा देणे चालूच ठेवतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.