कोलकाता : तृणमूल काँग्रेसने शनिवारी पक्षाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांना आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. आरजी कार बलात्कार-हत्येची घटना आणि त्यानंतर झालेल्या निषेधानंतर सप्टेंबरमध्ये जवाहर सरकार यांनी पक्षाच्या राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.
आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी ऋतब्रत बॅनर्जी यांची उमेदवारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे, असे पक्षाने एक्सवर पोस्टमध्ये म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या एकमेव रिक्त जागेवर 20 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून, इतर तीन राज्यांतील जागांसाठीही पोटनिवडणूक होणार आहे.
ऋतब्रत बॅनर्जी 2017 पर्यंत सीपीआय(एम) सोबत होते आणि टीएमसीमध्ये सामील होण्यापूर्वी राज्यसभा खासदार होते. दरम्यान, तृणमूलचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी ऋतुब्रत यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून ते सर्वथा यासाठी पात्र असल्याचे अभिषेक यांनी म्हटले आहे.