मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 100 कोटींच्या खंडणीविषयी केलेल्या गौप्यस्फोटांवर प्रथमच भाष्य करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. चांदिवाल यांनी केलेल्या दाव्यांची मला पूर्ण कल्पना आहे. या लोकांनी (अनिल देशमुख व सचिन वाझे) मला माझ्या आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला होता, असे ते म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या नेतृत्वात एक समिती नियुक्त करण्यात आली होती.
या समितीचा अहवाल अद्याप समोर आला नाही. पण चांदिवाल यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यातील अनेक मुद्यांवर विस्तृत भाष्य केले आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख व वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे या दोघांनी एका प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता, असे ते या मुलाखतीत म्हणाले होते.
Maharashtra Assembly Election 2024 : आघाडीचे सरकार येताच मोदींची सत्ता डगमगणार – संजय राऊत
27 एप्रिल 2022 रोजी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक अहवाल सोपवला होता. त्यात आम्ही मांडलेले मुद्दे कोणत्याही सरकारच्या पचनी न पडणारे होते. त्यामुळेच माझा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नसावा. विशेषतः हा अहवाल तयार करण्यासाठी मला शासकीय अधिकाऱ्यांनी पुरेशी मदत केली नव्हती हे ही खरे आहे, असेही चांदिवाल याविषयी म्हणाले होते.