पुणे – काश्मीरमधील कुपवाडा येथील माचिल सेक्टर येथे घुसखोरीविरोधी कारवाईत शहीद झालेले कॅप्टन आशुतोष कुमार यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतर्फे मानवंदना अर्पण करण्यात आली. प्रबोधिनीच्या “हट ऑफ रिमेम्बरन्स’ येथे सुवर्णाक्षरात त्यांचे नाव कोरण्यात आले.
प्रबोधिनीच्या 132 व्या तुकडीचे विद्यार्थी असलेले कॅप्टन आशुतोष कुमार हे मे 2017 मध्ये प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडले. लष्कराच्या मद्रास रेजिमेंटच्या 18 व्या बटालियनमध्ये त्यांची नेमणूक झाली होती.
लष्करातर्फे दि. 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी कुपवाडा येथे राबवण्यात आलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान त्यांना वीरगती प्राप्त झाली. प्रबोधिनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी कॅप्टन कुमार यांना मानवंदना अर्पण केली.