पुणे : कबड्डी हा एक स्वस्त, साधा आणि निरोगी खेळ असूूून त्याला कोणत्याही प्रकारच्या अँक्सेसरीजची आवश्यक ता लागत नाही असे मत जयनाथ तरुण मंडळा चे संस्थापक अध्यक्ष आणि जयनाथ कबड्डी संघाचे आधारस्तंभ नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे यांनी व्यक्त केले.विजया दशमीचा मुहूर्त आणि जयनाथ कबड्डी संघचा वर्धापनदिनाचे औचित्य साधून कबड्डी मैदानाची विधिवत पुजा करण्यात आली.
तसेच मैदाना वरच हत्या करण्यात आलेल्या दिवंगत कबड्डी पट्टू क्षितिजा व्यवहारे हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उप स्थित कबड्डीपट्टूशी संवाद साधताना बाळाभाऊ धनकवडे बोलत होते.
नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे म्हणाले कबड्डीपटू होण्याचं स्वप्नं पाहणाऱ्या क्षितीजाची निर्घृण हत्या अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या हत्येमुळे सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून या हत्येचा निषेध व्यक्त करत असतानाच तिच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर व कठोरात कठोर शासन करणे हिच दिवंगत क्षितिजाला खरी श्रद्धांजली ठरेल.यावेळी कबड्डी प्रशिक्षक नंदकुमार काळोखे, आत्माराम फुके, केम्ब्रिंज शाळेचे मुख्याध्यापक कुजिंर सर, रामदास उत्तेकर, हरिभाऊ धुमाळ, कैलास चवरकर, रवी धोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.