#Video : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ओतुरमध्ये कडकडीत बंद; शहिदांना वाहिली आदरांजली 

पुणे – काश्‍मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी ओतुर येथे संपूर्ण गावात शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत ज्येष्ठ नागरीक,व्यापारी,युवक,महिला,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

रॅलीनंतर ग्रामस्थांकडुन दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  तसेच ओतुर गावात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळुन सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

मुस्लीम बांधवांचा मोठा सहभाग

भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवत मुस्लिम बांधवांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. या हल्ल्यात भारतीय जवान ‘बहुमुल्य रत्न’ हरपली आहेत. सर्व भारतीय मुस्लिम बांधव या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत असुन यापुढील काळात अशा परिस्थितीत सर्व दुःखात आम्ही सामील असणार असल्याच्या प्रतिक्रिया मुस्लिम बांधवानी यावेळी दिल्या.

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ओतुरमध्ये कडकडीत बंद

शहिदांना वाहिली आदरांजली पुणे – काश्‍मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी ओतुर येथे संपूर्ण गावात शांतता रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर ग्रामस्थांकडुन दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ओतुर गावात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळुन सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.सविस्तर बातमी आणि व्हिडीओसाठी https://goo.gl/K4DZ5f

Posted by Digital Prabhat on Wednesday, 20 February 2019

Leave A Reply

Your email address will not be published.