मार्चअखेर पुणे मेट्रोची ‘ट्रायल रन’

वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गावर धावणार; आणखी तीन बोगी पुण्यात दाखल

पुणे – पुणेकरांच्या स्वप्नातली मेट्रो प्रत्यक्षात धावणार आहे. या मार्चअखेरीस वनाज ते रामवाडी या मार्गावरील वनाज ते गरवारे महाविद्यालय या 5 किलोमीटर अंतरावर या मार्चअखेरीस “ट्रायल रन’ घेतली जाणार आहे. त्यासाठी मेट्रोचे आणखी तीन डबे दोन दिवसांपूर्वी पुण्यात दाखल झाले.

या मार्गांवरील जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले असून, जयभवानीनगर येथील महाविरणची ओव्हरहेड केबल दोन दिवसांत काढण्यात येणार आहेत. येथील खांबांचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे महामेट्रोचे रीच-2 चे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

महामेट्रोने वनाज येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो डेपो उभारला आहे. वनाज ते रामवाडी हा 16 किलोमीटरचा मार्ग असून, त्यात 15 स्थानके आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय, दुसऱ्या टप्प्यात गरवारे महाविद्यालय ते धान्य गोदाम आणि तिसऱ्या टप्प्यात धान्य गोदाम ते रामवाडी असे काम पूर्ण केले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.