सातारा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आणखी ३१जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती रविवारी रात्री आठ वाजता देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ३०९ झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारपासून करोनाने कहर केला आहे. मंगळवारी २८, बुधवारी १५, गुरुवारी २० जण पॉझिटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात एकही रुग्ण आढळला नव्हता; परंतु शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दिवसभरात ७७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २७८ झाली. त्यामुळे जिल्हा हादरून गेला. त्यात रविवारी ३१ रुग्णांची भर पडली आहे.
दरम्यान, जिल्हा कारागृहातील सहा कैदी रविवारी करोनामुक्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत १२० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. १८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर सात करोनाबाधितांचा म्रुत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कराड तालुक्यातील म्हासोली येथील निकट सहवासीत ३०, ५० व ५५ वर्षीय महिला, वर्षीय महिला, ६५ व २५ वर्षीय पुरुष, ९ वर्षाचे बालक. शामगाव येथील निकट सहवासीत ४२ वर्षीय पुरुष. इंदोली येथील निकट सहवासीत ३७ वर्षीय महिला, १५ वर्षीय तरुण , १४ वर्षीय तरुणी व १२ वर्षाची मुलगी असे एकूण ११.
पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ पाटण येथील ३६ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला व २ वर्षाचे बालक असे एकूण ३.
सातारा तालुक्यातील कारी येथील २४ वर्षीय तरुण, ५७ वर्षीय पुरुष. चाळकेवाडी येथील मुंबई येथून आलेली ३५ वर्षीय महिला. मुंबई येथून आलेला माळ्याचीवाडी (कण्हेर) येथील २७ वर्षीय युवक असे एकूण ४.
जावळी तालुक्यातील केळघर येथील १२ वर्षीय बालक,५३ वर्षीय पुरुष,१६ वर्षीय तरुण व ५२वर्षीय महिला असे एकूण ४.
वाई तालुक्यातील आसले येथील निकट सहवासीत ४९ वर्षीय महिला. वासोळे येथील निकट सहवासीत ८ वर्षीय बालक व ४३ वर्षीय महिला. आसरे येथील ७० वर्षीय सारीचा रुग्ण व मुंबई येथून आलेला ६७ वर्षीय पुरुषअसे एकूण ५.
महाबळेश्वर तालुक्यातील कासरुंड येथील निकट सहवासीत ८५ व ४० वर्षीय महिला असे एकूण २.
खटाव तालुक्यातील निमसोड येथील मुंबई येथून आलेला ३५ वर्षीय पुरुष एक.
कोरेगांव तालुक्यातील वाघोली येथील निकट सहवासीत ५६ वर्षीय महिला एक.
असे एकूण ३१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.