Trent Shares Crash। आजच्या शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात टाटा समूहाची कंपनी ट्रेंट लिमिटेडचे शेअर्स ९ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे दिसून येत आहेत. कंपनीने त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) महसूल वाढीमध्ये संभाव्य मंदीचा इशारा दिल्यानंतर शेअर्समध्ये ही घसरण झाली. टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडची शेअर किंमत बीएसईवर ८.६२ टक्क्यांनी घसरून ५६५३ रुपयांवर आली. तर मागील व्यापार सत्रात, बंद ६१८६.४० रुपयांवर होता. यासह, कंपनीचे मार्केट कॅप २.०४ लाख कोटी रुपयांवर आले.
ट्रेंटचे शेअर्स का कोसळले? Trent Shares Crash।
खरं तर, काल झालेल्या बैठकीत, व्यवस्थापनाने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या फॅशन व्यवसायात फक्त २० टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता, जो गेल्या पाच वर्षांच्या ३५ टक्के सीएजीआर (चक्रवाढ वार्षिक वाढ दर) पेक्षा खूपच कमी आहे. तथापि, कंपनीला येत्या काही वर्षांत २५ टक्क्यांहून अधिक सीएजीआरची महसूल वाढ अपेक्षित होती.
ब्रोकरेजने रेटिंग देखील केले कमी Trent Shares Crash।
एजीएमनंतर, ब्रोकरेज फर्म नुवामाने आर्थिक वर्ष २०२६ आणि २०२७ साठी कंपनीच्या महसूल वाढीच्या अंदाजात अनुक्रमे ५% आणि ६% कपात केली आणि EBITDA मध्ये अनुक्रमे ९% आणि १२% कपात केली. यासोबतच, नुवामाने स्टॉकवरील लक्ष्य किंमत ६,६२७ रुपयांवरून ५,८८४ रुपये केली आणि स्टॉकवरील रेटिंग ‘बाय’ वरून ‘होल्ड’ केले.
त्यांना ट्रेंटच्या स्टॉकवर विश्वास
दुसरीकडे, ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने ट्रेंटवरील त्यांचे ‘ओव्हरवेट’ रेटिंग ६,३५९ रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह कायम ठेवले आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की कंपनीची वाढ पुढील पाच वर्षांत २५-३० टक्क्यांच्या CAGR वर असू शकते. ट्रेंटला कव्हर करणाऱ्या २५ विश्लेषकांपैकी १८ जणांना स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग आहे, चार जणांना ‘होल्ड’ शिफारस आहे तर तीन जणांना ‘सेल’ रेटिंग आहे.