मुंबई – हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ‘रकुलप्रीत सिंह’ आपल्या ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. रकुलने 10 जानेवारी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रकुलप्रीतने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. सध्या अभिनेत्री तिच्या पुढील चित्रपटासाठी चर्चेत आहे. नुकतंच तिच्या आगामी ‘आय लव्ह यू’ या चित्रपटाचा टीझर आला असून तो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान, हा चित्रपट एक थ्रिलर आहे आणि रकुलप्रीत सिंहने केवळ 2 मिनिटे 30 सेकंदाच्या एका दृश्यासाठी मोठी जोखीम पत्करली असल्याचं दिसून आलं आहे. या सीनमध्ये रकुलप्रीत सिंहला पाण्याखाली राहावे लागले. या सीनसाठी रकुलने खूप जबरदस्त तयारी केली आहे. याबद्दल रकुलने सांगितले की, या चित्रपटात कथेतील भावना खोलवर समजून घेण्यासाठी मला एका विशेष प्रकारची विचारसरणी आवश्यक आहे.
आणि खऱ्या अर्थाने त्याच्याशी जोडण्यासाठी मी महिनाभराची मेहनतही केली. पाण्याखालील एका दृश्यासाठी मी महिनाभर रोज सराव केला. हा सिन फक्त दोन ते तीन मिनिटांचा होता, तसेच यासाठी मला खास प्रशिक्षण देखील देण्यात आले होते. अंडरवॉटर सीक्वेन्स शूट करण्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे मी दुपारी 2 ते पहाटे 4 वाजेपर्यंत पाण्यात होते आणि दिवसभर मी भिजत होतो आणि पाणी खूप थंड होते. असं अभिनेत्रीने सांगितलं.
साधारणपणे, अंडरवॉटर शूटिंग खूप आव्हानात्मक असते कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. शूटिंगदरम्यान मी बाहेर येताच युनिटचे लोक प्रत्येक शॉटनंतर माझ्यावर गरम पाणी टाकत होते जेणेकरून माझे शरीर जास्त थंड होऊ नये. साहजिकच पाण्यातील क्लोरीन तुमच्या डोळ्यात जळत होते आणि तेही एक आव्हान होते. पण मी आव्हानाचा आनंद लुटला कारण त्यामुळे मला स्वतःला खूप पुढे ढकलण्यात मदत झाली. असं देखील यावेळी रकुल म्हणाली आहे.
दरम्यान, ‘आय लव्ह यू’ 16 जून रोजी OTT जिओ स्टुडिओवर रिलीज होत आहे. निखिल महाजन यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात रकुल प्रीत सिंगसोबत पावेल गुलाटी, अक्षय ओबेरॉय आणि किरण कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.