लोणावळा – लोणावळ्यापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर असलेला मोरगिरी या गडाच्या ट्रेक मार्गावर ट्रेकिंग पलटन ग्रुप (पुणे) यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गडावर वेगवेगळ्या खुणा स्थापित करून हा ट्रेक मार्ग सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला.
मोरगिरी हा तसा ऑफबीट ट्रेक. त्यामुळे सामान्य पर्यटकांना तसा अपरिचित. या गडावर फारसे ट्रेकर्स येत नसल्याने ट्रेक मार्ग अस्पष्ट आहेत. शिवाय अनेक ढोरवाटाही आहेत. यामुळे ट्रेकर्स भरकटण्याची शक्यता अधिक असते. विस्तीर्ण पठार आणि घनदाट झाडी यामुळे अनुभवी ट्रेकर्स सुद्धा मार्ग चुकू शकतात. हे लक्षात घेऊन, ट्रेकींग पलटन गृपच्या सदस्यांनी रविवारी (दि. 22) मोरगिरी गडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी ट्रेकर्स ची दिशाभूल होऊ शकते. तसेच गडावर आणि गड मार्गावर मोहीम राबविली.
या कार्यात ट्रेकिंग पलटन ग्रुपच्या परशुराम भांगरे, नितीन कुलकर्णी, संदीप चौधरी, हेमंत पाटील, संदीप जाधव, अमोल गोरे, ललित बागल, पवन पाटील, नितीन बागले, सचिन शिंदे, संजय ववले आणि डॉ. सुरेश इसावे यांनी सहभाग घेतला. नियोजनात प्रा. डॉ. अनिता धायगुडे आणि प्रा. डॉ. संदीप गाडेकर यांचे सहकार्य लाभले.