नगर – शहराची ओळख हरित शहर होण्यासाठी प्रत्येक प्रभागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होणे गरजेचे आहे. तसेच उपनगरातील तपोवन परिसराचा विकास झपाट्याने होत असून, परिसरात नव्याने बांधकाम होत आहे. या परिसरात भरपूर औषधी व बहुपयोगी झाडांचे रोपण करणे गरजेचे आहे असे, प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
तपोवन रस्त्यावरील ढवनवस्ती भागात नव्याने होणाऱ्या वसाहतींमध्ये विविध औषधी, फळ, फुले व बहुपयोगी झाडांचे रोपण आ.जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जीवन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा, पिंपळ, मोहर, सप्तपर्णी, बहावा, वाळव, मोहर, काशीद, जांभूळ, कडुलिंब, कन्हेर, सिसम या बहुपयोगी व औषधी झाडांबरोबरच अनेक प्रकारच्या फुल झाडे लाऊन परिसराचे चांगले सुशोभिकरण करण्याचा उपक्रम उद्दोजक अनिल जोशी व बांधकाम व्यावासायीक अनिल गांधी यांनी राबवला.
यावेळी शिवाजी डोके, संजय कांडेकर, राम पिंपळे, राहुल बलदोटा, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्रिंबके, वैभव पोकळे, सुनील जाधव, अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी जोशी म्हणाले, निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त नागरिकांचे घरे असावीत या साठी ज्या ज्या भागात नव्याने अपार्टमेंट, बंगल्यांचे कामे सुरु आहेत, त्या ठिकाणचा परिसरात भरपूर झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतल आहे.