शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अनोखे आंदोलन
खडकी (प्रतिनिधी) – खडकीमध्ये जलवाहिनी टाकून झाल्यानंतर त्या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यात मोठं मोठी खडी टाकण्यात आली आहे. अशा पध्दतीने खड्डे बूजवण्यात आले असल्याने यातील मोठ मोठी खडी अपघाताला निमंत्रण देत आहेत.
एकीकडे पाऊस तर दुसरीकडे विखुरलेले खडी चाकाखाली येऊन पडण्याची भीती तर दुसरीकडे चारचाकी खाली खडी आल्यास ती उडून लागण्याची भीती आहे. त्यामुळे आता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड गंभीर अपघात होईपर्यंत वाट बघणार का? असा सवाल खडकीकर विचारीत आहे.
खडकी कॅन्टोमेंन्ट बोर्डाने ही रस्ते दुरुस्ती लवकरात लवकर करावी यासाठी खडकी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्याच ठिकाणी वृक्षारोपण व आंदोलन करण्यात आले. यावेळी करुणा घाडगे,दिपाली बिवाल, आशाआहेर, वृषाली शिवाजी पवार संगीता सोनवणे उपस्थित होते.