जिल्ह्यात 5 हजार हेक्‍टरवर होणार वृक्ष लागवड

पुणे  – आगामी वनमहोत्सवासाठी पुणे वनविभाग सज्ज झाले असून, वृक्षारोपणासंदर्भातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. वृक्ष लागवडीसाठी यंदा सुमारे 330 साइट्‌स उपलब्ध करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील 5 हजार हेक्‍टरवर वृक्ष लागवड केली जाणार आहे. इतकेच नव्हे, तर नागरिकांसाठी जिल्ह्यात 15 ठिकाणी सवलतीच्या दरात रोपेदेखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे जिल्ह्याच्या उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी यांनी सांगितले.

राज्यात 1 जुलै रोजी सुरू होणाऱ्या वनमहोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीलक्ष्मी यांनी माहिती दिली. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी डी.एस. घोलप उपस्थित होते. श्रीलक्ष्मी म्हणाल्या, ” 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 1 कोटी 53 लाख 36 हजार इतकी वृक्ष लागवड केली जाणार आहे. यामध्ये वनविभागातर्फे 52.34 लक्ष सामाजिक वनीकरण विभागातर्फे 24 लक्ष तर इतर शासकीय विभागातर्फे 76.02 लक्ष वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.’

69 रोपवाटिकांमध्ये 155 लक्ष रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सामाजिक वनीकरण विभागातर्फेदेखील मोफत रोपांचे वाटप केले जाणार आहेत. नागरिकांनीही जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

येथे मिळतील रोपे

उपवनसंरक्षक कार्यालय, सेनापती बापट रस्ता
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
निगडी रोपवाटिका
विभागीय आयुक्तालय,
औंध रोपवाटिका
भोर वनपरिक्षेत्र कार्यालय
बनेश्‍वर उद्यान, नसरापूर
जेजुरी कार्यालय
वेल्हा कार्यालय
शिरूर- पाबळ चौक
खेड- चाकण विभागीय कार्यालय

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here